समाधान रोकडे / सारोळे : कोरोनामुक्त गावासाठी बार्शी तालुक्यातील सारोळे ग्रामपंचायतने पाऊल ठेवत विविध उपाययोजना केल्या आहेत. गावच्या सीमा बंद करण्यात आल्या. गावातील युवकांना पोलीस मित्र म्हणून गाव गावाच्या सुरक्षितेसाठी नेमणूक करण्यात आली. सारोळे गावचे सर्व सीमा सील करण्यात करण्यात करण्यात आले यावेळी असून गावांमध्ये येणाऱ्या जाणाऱ्यांची चौकशी करून घेऊन सोडण्यात येणार आहे
पोलिस मित्र म्हणुन चंद्रकांत साबळे विकास साबळे नागराज साबळ नितीन गायकवाड स्वामी साबळे बापू साबळे अक्षय मोरे प्रमोद भोसले लक्ष्मण ठोंबरे रामकृष्ण गाटे याना ओळखपत्र देण्यात आले सदर युवक शिफ्ट मध्ये कार्य करणार आहेत. गावातिल शरद पवार प्रशाला येथे विलगीकरण कक्ष स्थापन करन्यात आला आहे.
यावेळी सरपंच बाळराजे गाटे यांनी माहीती देताना सांगीतले. कोरोनामुक्त गावासाठी ग्रामपंचायत सज्ज आहे अत्यावश्यक सेवा व कृषी मालाची वाहतूक चालूच राहील गावात निर्जुतिकरणासाठी करण्यासाठी दोन दिवस आड़ गावातून फवारणी सुरू आहे. एक हजार मास्क मास्क वाटप करण्यात आले . शरदचंद्रजि पवार प्रशाला येथे विलगिकरन कक्ष सुरु करन्यात आला आहे.नागरिकानी सहकार्य करावे. याप्रसंगी पंचायत सदस्य विलास गाटे, पोलिस कॉ.राठौड़, सरपंच बाळराजे गाटे, पोलिस पाटील अण्णा साबळे, मुख्याध्यापक सीएस गायकवाड, अप्पा ठोंबरे विजय महापूरे उपस्थित होते