सोलापूर : सोलापूर शहरामधील कोविड-19 कोरोना या संसर्गजन्य रोगाचा फैलाव होऊ नये यासाठी कोरोना जास्त बाधीत असलेल्या ठिकाणीच्या प्रभागातील नगरसेवकांची बैठक दिनांक 15 मे 2020 रोजी सकाळी 11.00 वाजता कै.यशवंतराव चव्हाण सभागृहात महापौर श्रीकांचना यन्नम यांनी आयोजित केली होती. सदर बौठकीत नगरसेवकांनी त्यांच्या प्रभागातील अडचणी सांगितल्या. तसेच शहरातील कंटेनमेंट झोनमध्ये सर्व नागरिकांची तपासणी करण्यात यावी. तसेच क्वॉरंटाईन केलेल्या रुग्णांची तपासणी लवकरात लवकर करुन त्यांचा रिपोर्ट लवकर जाहीर करावा तसेच ज्या भागात कोरोनाबाधीत रुग्ण आढळतात त्या भागातील नगरसेवकांना सूचीत करण्यात यावे जेणेकरुन त्या परिसरातील परिस्थितीची कल्पना येईल व उपाययोजना करण्यास सोयीस्कर होईल तसेच कोरोनाबाधीत रुग्णांचे स्वाप घेतलेले रिपोर्ट 24 तासाचे आत द्यावे अशी यावेळी मागणी करण्यात आली.
तसेच शास्त्री नगर येथील मनपाचा दवाखाना चालू करुन याठिकाणी नागरिकांना गोळया औषधे देण्याची व्यवस्था करावी तसेच शहरातील मोठे खाजगी हॉस्पिटल, छोटे खाजगी हॉस्पिटल, गार्डन मंगल कार्यालय, बांधकाम व्यवसाईक यांची बौठक घेण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.
तसेच कंटेनमेंट झोनमधील ज्येष्ठ नागरिकांना सुरक्षित राहण्यासाठी सोलापूर शहरातील सर्व मंगल कार्यालय ताब्यात घेण्यात येणार असून अशी माहिती आयुक्त दीपक तावरे यांनी दिली.तसेच नगरसेवकांनी आपल्या प्रभागातील मंगल कार्यालया तसेच फक्शन हॉल उपलब्ध असतील तर त्यांनी महापालिकेला कळवावे जेणे करून जेष्ठ नागरिकाची व्यवस्था करण्यात येईल. नागरिकांनी मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टन्सींग ठेवावे तसेच ज्येष्ठ नागरिकांना सर्दी, खोकला या सारखा आजार असल्यास तातडीने सिव्हील हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी दाखल करावे याबाबत नगरसेवकांनी नागरिकामध्ये जनजागृती करावी असे आवाहन महापौर श्रीकांचना यन्नम यांनी केले. कोरोनाबाधीत प्रभागातील उर्वरित नगरसेवकांची बौठक टप्याटप्याने घेण्यात येईल असे महापौर यांनी यावेळी सांगितले.
सदर बौठकीस महापौर सौ.श्रीकांचना रमेश यन्नम, सभागृहनेता श्रीनिवास आशप्पा करली, गटनेता किसन जाधव, गटनेता आनंद बाबुराव चंदनशिवे,गटनेता, रियाज खरादी, परिवहन सभापती जय साळुंके, आयुक्त डॉ.दिपक तावरे, नगर अभियंता संदिप कारंजे व नगरसेवक सर्वश्री अनिता व्यंकटेश कोंडी, जुगन समशेरसिंह अंबेवाले, सौ.प्रतिभा सुनिलमुदगल,राधिका दत्तात्रय पोसा, नुतन प्रमोद गायकवाड,नागेश वल्याळ, विजयालक्ष्मी पुरुड,सुनिल कामाठी, मंगला पाताळे, भरतसिंग बडुरवाले,अविनाश बोमडयाल, कामिनी आडम, राजश्री चव्हाण नगरसेवक उपस्थित होते.