सोलापूर: शहरात कोरोना चा कहर दिवसेंदिवस वाढत असून बुधवारी आठ नव्या रुग्णांची भर पडली आहे. सोलापूर शहर हद्दीतील एमआयडीसी पोलीस ठाण्यांमध्ये नेमणुकीस असलेले हेडकॉन्स्टेबल या कोरोनाचे बळी ठरले आहेत. मयत झालेले पोलिस हे एकता नगर मधील रहिवासी असून त्यांच्या घरातील दोन मुली ,पत्नी आणि एका मेव्हण्याला आरोग्य खाते तपासणीसाठी हॉस्पिटलला घेऊन गेले आहेत. या पोलिसाला 4 मे रोजी दाखल करण्यात आले होते मात्र त्यांचे पाच मे रोजी दुपारी साडेबारा वाजता निधन झाले. आजवर सोलापूर शहरात कोरोना ने दहा बळी घेतले आहेत.
बुधवारी आठ नव्या रुग्णांची भर पडली असून यामध्ये सदर बजार आणि मोदी या भागातील प्रत्येकी दोन रुग्ण आढळले आहेत .साई बाबा चौक, एकता नगर राहुल गांधी झोपडपट्टी आणि सिद्धेश्वर पेठ या भागातील प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे. आजवर सोलापूर शहर जिल्ह्यात एकूण 23 69 जणांची तपासणी करण्यात आली असून 153 अहवाल पूर्ण पॉझिटिव्ह आले आहे. सिव्हिल हॉस्पिटल मधून आजवर 24 रुग्णांवर यशस्वी उपचार करून त्यांना डिस्चार्ज देण्यात आले आहेत. एकूण 119 रुग्णांवर सोलापूर शहरातील तीन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.