येस न्युज मराठी नेटवर्क : लोक जनशक्ती पक्षाचे नेते आणि केंद्रीय मंत्री रामविलास पासवान याचं गुरुवारी निधन झालंय. मृत्यूसमयी ते ७४ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मुलगा चिराग पासवान यांनी आपल्या वडिलांच्या निधनाची माहिती सोशल मीडियावर दिलीय. ‘बाबा… तुम्ही या जगात नाहीत पण मला माहीत आहे की तुम्ही जिथे कुठे आहात सदैव माझ्यासोबत आहात’ असं ट्विट चिराग पासवान यांनी केलंय.
https://twitter.com/iChiragPaswan/status/1314221533653467137/photo/1