येस न्युज मराठी नेटवर्क : जागतिक आरोग्य संघटना (WHO) ने सांगितलं की, कोरोना महामारीचा किशोर वयातील मुलांवर फार कमी परिणाम झाल्याचं पाहायला मिळत आहे. रिपोर्टनुसार, जगभरात 20 वर्षांपेक्षा कमी वय असणाऱ्या 10 टक्क्यांहूनही कमी व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे. तर या वयोगटात 0.2 टक्क्यांहून कमी रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
WHO चे प्रमुख डॉक्टर टेड्रोस अधानोम घेब्रेयेसुस म्हणाले की, ‘आम्हाला माहिती आहे की, कोरोना व्हायरसमुळे किशोर वयातील मुलांचा जीव जाऊ शकतो. परंतु, 20 वर्षांहून कमी वय असणाऱ्या मुलांमध्ये कोरोनाची बाधा झाल्याचं प्रमाण कमी आढळून आलं आहे.’ पुढे बोलताना ते म्हणाले की, कोरोना व्हायरसची बाधा होणाऱ्यांमध्ये आणि त्यामुळे मृत्यू होणाऱ्यांच्या आकड्यात खूप मोठी तफावत आहे. कोरोना व्हायरसच्या विळख्यात अडकलेल्या मुलांमध्ये बऱ्याच काळापर्यंत लपून राहतात. दरम्यान या वयोगटातील मुलांमध्ये कोरोनाचे गंभीर परिणाम अत्यंत कमी प्रमाणात दिसून येतात. तसेच ते म्हणाले की, लहान मुलांमध्ये आणि तरूणांमध्ये महामारीचा धोका आणि मृतांच्या आकडेवारीचा सखोल अभ्यास करण्यासाठी सखोल संशोधनाची गरज आहे.