सोलापूर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने विविध उपाय योजना करण्यात येत आहे. आज जुना सभागृह येथे महापालिकेचे सर्व मुख्य आरोग्य निरीक्षक व आरोग्य निरीक्षक यांची आढावा बैठक आयुक्त पी.शिवशंकर यांनी घेतले. सोलापूर शहरातील विविध भागातील समस्या बाबत चर्चा यावेळी करण्यात आले.महानगरपालिके कडील कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्या करिता “Geo Tagging बेस्ड हजेरी प्रणाली सिस्टीम” सुरू केलेले आहे. या प्रणालीमध्ये फोटो द्वारे हजेरी नोंद करण्यात येते. या मध्ये फोटो बरोबर “रेखांश आणि अक्षांश”, दिनांक, वेळ हे सर्व उपलब्ध होतात. या मुळे कर्मचारी यांना वेळेत हजर राहणे हे बंधनकारक आहे. जे कर्मचारी वेळेत कामावर उपस्थित राहणार नाहीत अश्या सेवकांचे लेट मार्क पकडले जाईल व जे कर्मचारी हे न सांगता पूर्व परवानगी शिवाय गैरहजर राहतात त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल अशी माहिती मा. आयुक्त पी.शिवशंकर यांनी दिली.
कोरोना विषाणूचा पर्दुभाव रोखण्याकरिता आरोग्य निरीक्षक यांच्या माध्यमातून कार्यक्षेत्रामध्ये प्रतिबंधातमक उपाययोजनांची अमलबजावणी करणेत येत असून सार्वजनिक ठिकाणी चेहऱ्यावर मास्क लावणे, फळ व भाजी विक्रेते यांनी मास्क व हंड्गोल्जचा वापर करणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, दुकानदार व्यावसायिक यांनी मास्क व हंड्गोल्जचा वापरणे आवश्यक आहे.
शहरातील प्रभागात सार्वजनिक ठिकाणी फिरणाऱ्या व्यक्ती अथवा बाजारपेठ येथे फिरणाऱ्या व्यक्ती किंवा दुकानादार जर मास्क ,हॅन्ड ग्लोज वापरत नसले तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात यावे. तसेच सार्वजनिक ठिकाणी थुकने, सिगरेट पिने आशा व्यक्ती आढळल्यास त्या व्यक्तीवर त्वरित दंड आकरण्यात यावे जर त्या व्यक्तीनी दंड न भरल्यास संबंधित व्यक्तीकडून नियमानुसार सार्वजनिक ठिकाणी एक दिवस सार्वजनिक काम करून घ्यावे असे आदेश केंद्र सरकारने या आदी दिले आहे .त्याची अंमलबजावणी त्वरीत अमलात आणावे.आणि दंड न देणाऱ्या व्यक्तीकडून त्या भागातील एक दिवस सार्वजनिक साफ सफाई करून घ्यावे.तसेच शहरातील बाजारपेठ मध्ये जे व्यक्ती कॅशलेसचा वापर करत नाही अशा दुकानावार कारवाई करावे.आशे सूचना मा.आयुक्त पी.शिवशंकर यांनी दिले.यावेळी उपायुक्त आजयसिंह पवार,कामगार कल्याण जनसंपर्क अधिकारी विजयकुमार कांबळे तसेच मुख्य आरोग्य निरीक्षक व आरोग्य निरीक्षक आदी मान्यवर उपस्थित होते.