येस न्युज मराठा नेटवर्क :करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व शाळा-महाविद्यालयांना ३१ मार्चपर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षा वेळापत्रकानुसारच होणार आहेत. राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागानं हे परिपत्रक काढलं आहे.