दक्षिण सोलापूर: तोगराळी येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त संयोजक अजय मुगळे यांनी भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन आनंद गायकवाड आणि सुरज गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले.
रविवार दि.२६जानेवारी ते बुधवार दि,१९ फेब्रुवारीपर्यत होणाऱ्या या भव्य क्रिकेट स्पर्धेसाठी परिसरातील एकूण ५० संघानी नाव नोंदणी केली असून प्रथम पारितोषिक २१०००/ रुपये आणि ए एम चषक.द्वितीय पारितोषिक ११०००/रुपये आणि ए एम चषक. तृतीय पारितोषिक ५५५५/रुपये आणि ए एम चषक.याशिवाय स्पर्धेत चमकदार कामगिरी करणाऱ्या उत्कृष्ट खेळाडूंना वैयक्तिक बक्षिस देऊन गौरव करण्यात येणार आहे . या क्रिकेट स्पर्धेच्या उदघाटनप्रसंगी हरीदास मुगळे.सचिन कोळी.पांडुरंग मुगळे.सुरज मिरगे.विष्णू पाटील.सचिन मुगळे.अमर भाले,सुरेश होवाळे.सागर कोळी.यांच्यासह शिववाल्मिकी आणि दोस्ती आखाडातील बहुसंख्य कार्यकर्ते गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते .