सोलापूर : नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदा जयपुर ,या देशातील आयुर्वेदाच्या सर्वोच्च संस्थेच्या गव्हर्निंग कौन्सिल मधे सोलापूरचे डॉक्टर तात्यासाहेब देशमुख यांची आयुष मंत्रालय भारत सरकार यांचेकडून नियुक्ती करण्यात आली आहेत.
एनआयए ही संस्था आयुर्वेदाचे शिक्षण, संशोधन, प्रचार-प्रसार व आयुर्वेदीय औषधींचे मूल्यांकन करणारी देशाची अग्रगण्य संस्था असून आयुष मंत्री,भारत सरकार यांच्या अध्यक्षतेखाली काम करते. सोलापूरच्या डॉक्टर तात्यासाहेब देशमुख यांच्या रूपाने महाराष्ट्राला या संस्थेवर प्रतिनिधित्व करण्याची प्रथमच संधी मिळत आहे.
डॉक्टर देशमुख हे अंकोली तालुका मोहोळ या ग्रामीण भागातून पुढे आले असून त्यांनी आयुर्वेदामध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. गेल्या 23 वर्षापासून सोलापूरच्या वैद्यकीय क्षेत्रात ते आपली सेवा देत आहेत. सोलापुरातील विविध सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा सहभाग असतो. याशिवाय उत्तरकाशी उत्तराखंड येथील आयुर्वेद वैद्यकीय महाविद्यालयामध्ये सहयोगी प्राध्यापक म्हणूनही ते कार्यरत आहेत. त्यांच्या या निवडीबद्दल वैद्यकीय तसेच इतर सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.