अभिनेत्री, आंतरराष्ट्रीय ब्युटी क्वीन आणि सुपर मॉडल उर्वशी रौतेला बॉलिवूडची ती स्टार आहे ज्याने ‘ऐस्लाडोस’ चित्रपटाद्वारे आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. उर्वशीने एका आंतरराष्ट्रीय चित्रपटाचा भाग होण्याची संधी मिळून भारताचे प्रतिनिधित्व करण्यास अभिमान वाटतो हे सांगितले. भव्य सौंदर्याच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट पदार्पणाच्या घोषणेने इंटरनेटवर वादळ निर्माण झाले आहे.
उर्वशी रौतेला आपल्या चित्रपटाबद्दल बोलताना म्हणाली, “मला खूप अभिमान वाटत आहे कि मी माझ्या देशाला व पूर्ण आशियाला आंतराष्ट्रीय पदावर नाव गाजवले आहे. मी खरोखरच प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय कलाकारांसह सहकार्य केले जेणेकरून माझे हे स्वप्न पूर्ण झाले. हया डॉक्युमेंटरीमध्ये आरोग्याच्या संकटाचा सामना करून जगभरातील जीवन दाखविण्यात आले आहे”.
ती पुढे म्हणाली, ” ही डॉक्युमेंटरी सुमारे ३० देशांचा प्रवास करेल आणि या महिन्यांत नवीन जीवनशैली प्रतिबिंबित करेल. ही चार भागाची मिनी-डॉक्युमेंटरी मालिका आहे जी या आत्ता आपण ज्या अत्यंत विरोधाभासी वास्तविकतेमधून जात आहोत त्याबद्दलचे सत्य दाखवते. या कठीण काळात मानव वंशाची ताकद आणि आशा दर्शवते. आपण हे सर्व युट्युब वर पाहू शकतात.
आणखी एक स्वप्न साकार झाल्यामुळे, उर्वशीला अश्या प्रतिष्ठित प्रकल्पात सहभागी झाल्याने आनंद झाला आहे. लुइसिटो कोमुनिका आणि जुआन्पा झुरिता यांनी मिनी डॉक्युमेंटरीचे दिग्दर्शन आणि निर्मिती केली आहे, आणि मारियानो डी वायो, सेबास व्हिलालोबस, लोगन पॉल, जॉर्ज क्रेमाडेस, ट्वान कुइपर, जेन सेल्टर, केसी निस्ताट आणि बरेच इतर हॉलीवूड चेहरे या मिनी डॉक्युमेंटरीचा भाग आहेत.
इतिहासात दोनदा मिस युनिव्हर्स इंडियाचे विजेतेपद मिळविणारी उर्वशी ही एकमेव महिला आहे कारण तिचा अल्पवयीनपणामुळे तिला मिस युनिव्हर्स इंडिया २०१२ ची सुरुवातीची पदवी सोडावी लागली. तिने सौंदर्य स्पर्धेतून आपल्या कारकीर्दीची सुरूवात केली आणि मिस दिवा २०१५ मिस युनिव्हर्स इंडिया ह्यात विजेता झाली.आणि यापूर्वीही त्याने अनेक आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारताचे प्रतिनिधित्व केले आहे