सोलापूर : सोशल डिस्टन्सिंग आणि इतर अटींवर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे कामकाज दि. 16 जूनपासून सुरू झाले आहे. लॉकडाऊन कालावधीपर्यंत शिकाऊ परवाने दिलेल्या व मधल्या काळात त्यांची वैधता संपली आहे, अशांना 30 सप्टेंबर 2020 पर्यंत वैधता वाढविण्यात आली आहे. यामुळे शिकाऊ परवाना संपला असला तरी पक्क्या परवान्याची चाचणी देता येणार आहे. परवाना किंवा वाहन विषयक कामासाठी परिवहन सेवा वेबसाईटवरून अपॉईंटमेंट घेऊनच अर्ज करता येणार आहे. मास्क व हॅन्डग्लोज घालूनच कार्यालयात प्रवेश बंधनकारक करण्यात आला आहे.