सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील वांगी या गावात, श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील मूर्तीची विटंबना करून अनिल भारत सुरवसे यांनी चप्पलने मूर्तीला मारून अश्लील शिवीगाळ केली आहे.त्यामुळे त्यांच्यावर कडक कारवाई होऊन ताबडतोब अटक करण्यात यावी. अशी मागणी अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या वतीने करण्यात आली आहे.
मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख यांना देण्यात आले. या संबधी रीतसर गुन्हा तालुका पोलीस स्टेशनमध्ये नोंद झाला आहे.
आम्हा वारकरी बांधवांच्या भावना दुखावल्या आहेत. पुढे असा अनर्थ घडूनही यासाठी तातडीने लक्ष घालून निर्णय घ्यावा. अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा अखिल भारतीय वारकरी मंडळाचे प्रदेशाध्यक्ष ह.भ.प.सुधाकर महाराज इंगळे यांनी दिला आहे
यावेळी जिल्हाध्यक्ष ज्योतीराम चांगभले, उत्तर सोलापूर तालुक्याचे अध्यक्ष निवृत्ती पवार,कुमार गायकवाड, तात्यासाहेब सातपुते,आबा भिसे आदी पदाधिकारी उपस्थित होते.