येस न्युज मराठी नेटवर्क : महाराष्ट्रात अनलॉक-४ संदर्भात नियमावली जाहीर केली आहे. राज्य सरकारच्या या नियमावलीनुसार आता जिल्हांतर्गंत प्रवास करताना ई-पासची अट्ट हद्दपार करण्यात आली आहे. आता ई-पासशिवाय राज्यात प्रवास करता येणार आहे. केंद्रानं परवानगी दिल्यानंतरही राज्यात ई-पासची अट कायम ठेवण्यात आली होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या टीकेनंतर अखेर राज्य सरकारनं ई-पास संदर्भात मोठा निर्णय घेतला आहे