येस न्युज मराठी नेटवर्क : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इतिहासात प्रथमच ऑक्टोबर महिन्यात हाेणारा तुळजाभवानीचा शारदीय नवरात्र महाेत्सव भाविकांविना साजरा करण्यात येणार आहे. मंचकी निद्रेसह, घटस्थापना, छबिना, सर्व अलंकार पूजा, सीमोलंघन आदी सर्व विधी परंपरेप्रमाणे पार पडणार असले तरी यावेळी पुजारी, सेवेकरी यांच्या संख्येवर मर्यादा असणार असून सगळ्यांची रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्यात येणार अाहे. महत्त्वाचे म्हणजे नवरात्रात तुळजापुरी येऊ नका, असे आवाहन पुजाऱ्यांकडून भाविकांना केले जाणार आहे.