सोलापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आमदार सुभाष देशमुख यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर, आयुक्त दीपक तावरे यांची भेट घेत शहर आणि जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. शहरात पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे लवकरात लवकर रॅपिड टेस्ट वाढवावी, रेशन दुकानातून धान्याचे वितरण व्यवस्थित करा, प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करावेत, गाळेधारकांकडून भाडे घेऊ नका, यासह अनेक सूचना आमदार देशमुख यांनी प्रशासनाला दिल्या.
आ. देशमुख यांनी सकाळी पालिका आयुक्त तावरे यांच्याकडून आढावा घेतले. ते म्हणाले की, सध्या लॉकडाऊन असल्यामुळे अनेकांचा रोजगार बुडाला आहे. त्यामुळे महापालिकेने गाळे भाडे घेऊ नये तसेच कर कर आकारणी ही करू नये. रूग्णाचे प्रमाण वाढत आहे त्यामुळे महापालिकेने कोरोना वारियर्सच्या रॅपिड टेस्ट वाढवणे आवश्यक आहे. याशिवाय नागरिकांना जर काही स्वयंसेवक घरपोच सेवा देत असतील तर त्याबाबत निश्चितच आपण मध्यस्थी करू. त्यानंतर आ. देशमुख यांनी जिल्हाधिकारी शंभरकर यांची भेट घेत त्यांच्याकडून शहर आणि जिल्ह्याचा आढावा घेतला. रेशन दुकानातून धान्याचे वितरण व्यवस्थित होत नाही, त्यात सुसूत्रता आणावी, शहरात रूग्ण वाढत असल्याने सिव्हील हॉस्पिटलवर ताण येत आहे. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करावे, खते, औषधे दुकानासाठी गाड्या उपलब्ध करून द्याव्यात, बँक मित्रांकडून ग्राहकांना घरपोच सेवा देण्याचा प्रयत्न करावा, स्वयंसेवक तयार करून नागरिकांना घरपोच सेवा द्यावी, आपल्याकडून त्याला सहकार्य असेल. ग्रापमंचायत, नगरपालिकेला तीन महिने भाडे घेऊ नये असा आदेश द्यावा.

शासकीय रुग्णालयात जाऊन घेतली माहिती
आ. देशमुख यांनी सिव्हिल येथेही भेट देऊन आढावा घेतला. रुग्णालयात कर्मचारी किती आहेत, ते सर्व ङ्गिट आहेत का, सर्वांना संरक्षण साहित्य पुरेसे उपलब्ध आहे का, तपासणी सेंटर कुठे आहे याबाबत सर्व माहिती जाणून घेतली. इतर पेशंटची व्यवस्था कुठे केलेली आहे याची माहिती घेतली. गरोदर महिला पेशंटसाठी दुसरीकडे व्यवस्था करावी, अशी सूचना केली. याशिवाय नवीन हॉस्पिटलसाठी रुग्णालयाने प्रस्ताव द्यावा, आपण त्यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करू, असेही आमदार देशमुख यांनी सांगितले.
क्वारंटाईन कक्षातील नर्स, कर्मचार्यांचे केले कौतूक
आ. देशमुख यांनी मंगळवारी केगाव येथे जाऊन क्वारंटाईन कक्षात काम करणार्या नर्स आणि कर्मचार्यांच्या कामाचे कौतूक केले. येथे असणार्या रूग्णांची काय व्यवस्था केली, त्यांना कोणते औषधे देण्यात येतात, सर्वांना संरक्षण कीट आहेत का याची विचारपूस केली तसेच त्यांना येणार्या अडचणी जाणून घेतल्या.