मोडनिंब : आष्टी उपसा सिंचन योजनेतून डावा कालवा कि.मी.१ ते १४ साठी प्रथमच पाणी सोडल्याने मोहोळ व माढा तालुक्यातील शेतकरी वर्गातून आनंद व्यक्त साजरा होत आसून ठिकठिकाणी पाण्याचे पुजन शेतकरी वर्गातून करण्यात येत आहे. गेली २२ वर्षापासून येथील परिसरातील शेतकरी , राजकीय नेते या पाण्यासाठी मागणी करत होते.
उपोषणे अंदोलन आदि माध्यमातून पाण्यासाठी संघर्ष सुरु होता या संघर्षाला यश आले आसून आष्टी उपसा सिंचन पंपगृह क्र.१ ते डावा कालवा किलोमीटर १ ते १४ या योजनेतून वर्षातून रब्बी व खरीप पिकांसाठी दोन ते तीन आवर्तेने होणार असून या पाण्याखाली मोहोळ व माढा तालुक्यातील ४०० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार असल्याची माहीती उजनी कालवा उपविभागाचे उपविभागीय अभियंता बाळासाहेब जाधव यांनी दिली. या पाण्याचे पुजन राष्ट्रवादी चे माजी जिल्हाध्यक्ष मनोहर भाऊ डोंगरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी राहुल केदार सुनिल ओहोळ सोमनाथ माळी यासह परिसरातील शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.