सोलापूर : श्री क्षेत्र पंढरपूर येथे प्रत्येक महिन्याला वारी निमित्ताने लाखो वारकरी येतात.आषाढीवारी हा वारकरी परंपरेतील महत्वाचा व सर्वश्रेष्ठ सोहळा आहे. वारी हा त्यांचा जीव की प्राण आहे. “पंढरीची वारी जयचीये कुळी |त्याची पाय धुळी लागो मज||” ना. म.ही धारणा असून “देह जावो अथवा राहो |” या विचाराने,निष्ठेने पिढ्यान पिढ्या वारकरी वारी करतात. त्यामुळे आषाढी वारीला निष्ठावान(महिन्याचे वारकरी ) वारकरी नित्यनेम पूर्ण करणेसाठी येतील त्यांना नगर प्रदक्षिणा करणेसाठी परवानगी देऊन सहकार्य करावे. परवानगी न घेता वारकरी पंढरपूरला आले आणि शासन अडथळा करू लागल्या नंतर अनर्थ घडला तर त्याला सर्वस्वी जबाबदार शासन व अधिकारी असतील. महाराष्ट्रात रेड झोन मधील दुकानें व्यवहार तसेच सर्व कंटेनमेन्टझोन मधील दुकानें, व्यवहार, माणसांची ये जा सुरळीत चालू आहे.तर वारकरी परंपरा, आषाढी वारीला प्रतिबंध का केला जात आहे. महाराष्ट्रात सर्व तीर्थक्षेत्र प्रवेश सुरु आहे. तर पंढरपूर प्रवेश बंद का केला. हा वारकरी भाविकांवर, संप्रदाय, परंपरा यावर जाणीव पूर्वक अन्याय केला जात आहे.
मुंबई मधील लोकल सुरु झाली.मार्केट मधील गर्दीवर नियंत्रण नाही. सर्व ठिकाणचे सर्व व्यवहार सुरळीत चालू आहेत. वारकरी भाविकांना प्राणप्रिय वारीला बंदी का केली जात आहे.हा पक्षपातीपणा केला जात आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व पालखी, पादुका, वारकरी यांना नियम व अटी घालून एकादशीला पंढरपूर नगर प्रदक्षिणा करणेसाठी लवकरात लवकर परवानगी देऊन सहकार्य करावे. सध्या जे वारकरी पायी चालत पंढरपूरला येत आहेत. त्या वारकरी भाविकांना ही एकादशीला पंढरपूर नगर प्रदक्षिणा परवानगी द्यावी. कारण ते वारकरी बिस्कीट, चुरमुरे खाऊन वारी करत आहेत. त्यामुळे त्यांना ही परवानगी द्यावी. ही नम्र विनंती अन्यथा दि. 28-06-2020 रोजी राज्यभर स.10.00 वा. भजन आंदोलन(स्वतःच्या घरी ) करावे लागेल.निर्णय झाला नाही तर त्यापुढे आत्मदहन हा पर्याय अवलंबावा लागेल. असे निवेदन मा. मुख्यमंत्री, मा उप मुख्यमंत्री यांना अ.भा. वारकरी मंडळाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ह.भ.प.सुधाकर इंगळे महाराज,जिल्हा अध्यक्ष जोतिराम चांगभले, शहर अध्यक्ष संजय पवार व सर्व पदाधिकारी यांनी ईमेल द्वारे दिले.