- लवकरच सुरू होणार चौपदरीकरणाचे काम
सोलापूर – मंगळवेढा राष्ट्रीय महामार्ग कमांक 166 च्या चौपदरीकरणामधील मुख्य अडथळा ठरणारा भैय्या चौकातील रेल्वे उडाणपूलाचा प्रश्न सोलापूर महापालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर यांच्या प्रयत्नाने मार्गी लागला.
सोलापूर – मंगळवेढा राष्ट्रीय महामार्ग कमांक 166 च्या चौपदरीकरणांतर्गत कि.मी. 377//800 भैया चौक या ठिकाणी असणा-या जुन्या रेल्वे उड्डाणपूलाच्या ठिकाणी प्रत्येकी दोन 12.5 मी. रुंदीचे ](९0)]3 बांधण्याचा प्रस्ताव मंजूर असून सदर आराखडयात (रेल्वे उडाणपूलाची प्रस्तावित लांबी रेल्वेने मंजूरी दिल्याप्रमाणे 100.5 मी असून त्यामध्ये (100.2 इतक्या मिटरचे) गाळे आहेत.
सदर नवीन रेल्वे उडाणपूल बांधण्यासाठी आवश्यक असणा-या पोहोच मार्गाच्या जमीनीचा ताबा न मिळाल्यामुळे सदरचे काम हे पाठीमागील एक वर्षापासून सुरु करता आले नव्हते. सदर कामासाठी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण व मध्य रेल्वेचे सोलापूर विभाग यांनी प्राधान्याने जागा ताब्यात मिळण्यासाठी महापालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर यांना विनंती केली होती. त्या अनुषंगाने मा. महापालिका आयुक्तांनी सदर एन.जी. मिल ही जागा महाराष्ट्र वस्त्रोद्योग महामंडळाच्या (एमटीसी) यांच्याकडून जागा ताब्यात घेण्यासाठी वेळोवेळी पत्रव्यवहार व पाठपुरावा केला होता.
एन.जी. मिल प्रस्तावित पोहोच मार्गासाठी एन.जी. मिलच्या ताब्यातील सिटी सर्व्हे नंबर 8467 व 8468 या दोन गटामधील 5675 चौ.मी. जागेचा आगाऊ ताबा मिळणे आवश्यक होते. त्यासाठी महापालिकेने महाराष्ट्र वस्त्रोद्योग महामंडळाला सदर जागेचा टीडीआर देण्याची आवश्यक कार्यवाही करण्यात येईल. परंतू प्रकल्प विहीत वेळेत पुर्ण करण्यासाठी सदर जमीनीची तातडीने आवश्यकता असल्याने सदर जागेचा आगाऊ ताबा घेणेसाठी सातत्याने महाराष्ट्र वस्त्रोद्योग मंडळाकडे पाठपुरावा केला होता. त्यामध्ये महाराष्ट्र शासनाचे वस्त्रोद्योग विभागाचे प्रधान सचिव मा. के. गोविंदराज यांच्याशी प्रत्यक्ष फोनव्दारे तसेच वेळोवेळी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून पाठपुरावा केला व अखेरीस त्यांच्या प्रयत्नांना यश येवून दिनांक 20//07/”2020 रोजी झालेल्या व्हीडीओ कॉन्फरंसींगमध्ये रेल्वे उडाणपूलाच्या पोहोच मार्गाचे बांधकाम करण्यासाठी सदर जमीनीचा आगाऊ ताबा देण्यास मान्यता देवून मा. प्रधान सचिव, मा. श्री. के. गोविंदराज, वस्त्रोद्योग यांनी मा. महापालिका आयुक्तांना कार्यवाही करण्याचे आदेश दिलेले आहेत व त्याप्रमाणे वस्त्रोद्योग महामंडळाच्या जमीनीचा ताबा भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाला रेल्वे उडडाणपूलाचे पोहोच मार्गासाठी बांधकाम करण्यात काम सुरु करण्यात आले आहे.
सदर अस्तित्वातील उडाणपूलाचे आयुष संपल्याचे रेल्वे विभागाने यापूर्वीच महापालिकेच्या निर्दशनास आणून दिले असून सदरवेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने चौपदरीकरणांतर्गत सोलापूर – मंगळवेढा राष्ट्रीय महामार्ग कमांक 166 मधील जुना पुल तोडून त्याठिकाणी दोन लेनचे दोन नवीन रेल्वे उडडाणपूल बांधण्याचे प्रस्तावित केले आहे व सदर कामास मंजूरी मिळून एप्रिल 2019 मध्ये सोलापूर – मंगळवेढा या 56 कि.मी. लांबीच्या चौपदरीकरणाचे काम सुरु झाले, त्यामध्ये या रेल्वे उड्डाणपूलाचा समावेश आहे. त्यामुळे आता हा पुलाचा प्रश्न मार्गी लागल्यामुळे पुढील आठ ते दहा महिन्यात सदर पुलाचे काम करण्याचे रेल्वे व भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने मान्य केले आहे. त्यामुळे सोलापूर शहरातील वाहतूक सुरळीत होईल तसेच सोलापूर दौंड या रेल्वेच्या विद्युतीकरणाला अडथळा करणारा जुना पुल पाडून विद्युतीकरण झाल्यामुळे पुणे सोलापूर किंवा सोलापूरहून जाणा-या रेल्वेचाही वेग वाढेल. तसेच, सोलापूर बेंगलोर ही रो-रो सर्व्हीस सेवा सुरु करण्यासाठीसुध्दा सदर जुन्या पुलाचासुध्दा अडथळा ठरत होता, या प्रश्नांमुळे सदर सर्व प्रश्न मार्गी लागले आहेत.