सोलापूर : आदर्श शिक्षक समिती दक्षिण सोलापूरच्या वतीने हळदी-कुंकू व तिळगुळ तसेच पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम जुळे सोलापूर मधील गोविंदश्री मंगल कार्यालयात पार पडला. ज्योती वाघमारे लिखित एक पाऊल समाजपरिवर्तनाच्या दिशेने,Word building , साद अंतर्मनाची,भाव कुंचल्यातले.. या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांचे हस्ते करण्यात आले.
यावेळी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुकाध्यक्ष रमेश घंटेनवरू यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष अंकुश काळे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षणधिकारी संजयकुमार राठोड, सभापती सोनाली कडते हे होते. पुस्तक प्रकाशन योगीराज वाघमारे जेष्ठ साहित्यिक, डाॕ.नसीम पठाण, वंदना कुलकर्णी कवयित्री, शाहीर रमेश खाडे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी आदर्श शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष राजकुमार राऊत, महिला आघाडी अध्यक्ष भाग्यश्री सातपुते, धोत्री पतसंस्थेचे चेअरमन फिरोज मणेरी, म.भा.सो पतसंस्थेचे चेअरमन संजीव चाफाकरंडे अक्कलकोट आदर्श शिक्षक समितीचे नेते विजय माळवे, आदर्श शिक्षक समितीचे नेते सिध्दू सुतार अतुल देशमुख,संतोष हुमनाबादकर विनोद बहिर्जे, बाबा शेख उपस्थित होते. याप्रसंगी लेखिका ज्योती वाघमारे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सुत्रसंचालन अकांक्षा बिराजदार यांनी केले तर आभार सूर्यकांत व्हनमाने यांनी मानले.