सोलापूर :देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त विशाखा महिला लोकसंचलित साधन केंद्राकडून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. सांजचे अविनाश कुलकर्णी, येस न्युज मराठीचे शिवाजी सुरवसे, मनपाचे उपयुक्त अजय पवार, डॉ.प्रसाद, बाबा मिस्त्री, सुदीप चाकोते, शांतलिंग शटगार यांची या सुशील रत्न पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. रविवार दि. 4 ऑक्टोबर रोजी सकाळी 11वाजता काँग्रेस भवन सोलापूर येथे कार्यक्रम होणार असल्याची माहिती माजी महापौर नलिनी चंदेले यांनी दिली.
आमदार रामहरी रुपनर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी माजी आमदार निर्मलाताई ठोकळ, विश्वनाथ चाकोते, शहर अध्यक्ष प्रकाश वाले, गटनेते चेतन नरोटे, माजी महापौर अरिफ शेख, नागरसेवक शिवा बाटलीवाला, माजी शहर अध्यक्ष सुधीर खरटमल, उपाध्यक्ष अंबादास गुत्तीकोंडा, भीमशन्कर टेकाळे, राहुल बोलकवठे, डॉ आप्पासाहेब बगले आदी उपस्थित राहणार आहेत.