सोलापूर : पुण्यशोल्क अहिल्यादेवी होळकर सोलापूर, विद्यापीठ सोलापूर यांच्या अंतिम वर्ष सोडून इतर सर्व वर्षांच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा महाराष्ट्र शासनाने रद्द केल्या आहेत. परंतु या विद्यार्थ्यांकडून संपूर्ण शुल्क भरून घेतले आहे. तरी परीक्षा रद्द झाल्यामुळे दोन महिन्यान पासून अभाविप सोलापूर परीक्षा शुल्क परत मिळावे किंवा पुढील सत्रात वर्ग करावे यासाठी विद्यापीठचा सातत्याने पाठपुरावा करीत आहे. तरी विद्यापीठ या संदर्भात कोणताही निर्णय घेत नसल्यामुळे आज रस्त्यावर उतरण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आली आणि विद्यार्थ्यांनी परीक्षाच झाल्या नाहीत तर आमची शुल्क परत करा किंवा पुढच्या सत्रात वर्ग करा. नवीन शैक्षणिक वर्षाचे शैक्षणिक शुल्क ३०% सरसकट कमी करावे.
प्रवेशाच्या वेळी जास्तीत जास्त १५% शुल्क घेण्यात यावे व उर्वरित शैक्षणिक शुल्कास ४ टप्यात भरण्याची सवलत द्यावी. शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्यांच्या घेण्यासंदर्भात न्यायालयाने निर्णय दिला आहे त्याची अंमलबजावणी करत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने उपयोजना करत परीक्षांचे नियोजन करावे अश्या मागण्या कुलगुरूंना निवेदना द्वारे शिष्टमंडळाने केल्या आहेत.
मोर्चेच्या मध्यमातू ज्या शैक्षणिक संस्था आणि सत्तेचा दुरुपयोग करत महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची आर्थिक पिळवणूक उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत कश्या प्रकारे करतात याची बैलगाडी द्वारे प्रतीकृती दाखवण्यात आली. तसेच उदय सामंत राजीनामा द्या अशा घोषणानच्या मध्यमातून राजीनामाची मागणी करण्यात आली.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश सहमंत्री सिद्धेश्वर लटपटे यांनी धुळे येथे विद्यार्थी व अभाविप कार्यकर्ते पालकमंत्र्यांना शैक्षणिक प्रश्न मांडण्यासाठी गेले असता वेळ न दिल्यामुळे संविधानिक मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अमानुषपणे पोलीस लाठीचार्ज व बुक्क्यांचा मारा करत असताना एसीच्या गाडीत बसून बघ्याची भूमिका घेणाऱ्या राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचा जाहीर निषेध व्यक्त करत राजीनाम्याची मागणी केली.
अभाविपच्या आज झालेल्या धडक मोर्चा मध्ये आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे थर्मल स्क्रीनिग करण्यात आले. तसेच सर्व सहभागी विद्यार्थ्यांनी सोशल डीस्टन्सचे पालन करत, आपल्या मागण्यासाठी आवाज उठवला. यावेळी प्रदेश सहमंत्री सिद्धेश्वर लटपटे, अंकीता पवार, जिल्हा संयोजक रामकृष्ण वैदय, प्रणव बाडगंडी, महानगर मंत्री सुरज पावसे, आनंद भूसनर आणि यासह सोलापूर जिल्ह्यातून हजारो विद्यार्थी विद्यार्थिनी कार्यकर्ते उपस्थित होते.