सोलापूर : उल्लेखनीय कामगीरीसाठी दिले जाणारे राष्ट्रपती पदक केंद्रीय अर्थ मंत्रालयाने शनिवारी जाहीर केले. यात सोलापूरचे केंद्रीय वस्तू व सेवा कर अधीक्षक संजय विश्वंभर कुलकर्णी यांचा समावेश आहे.
देशातील 28 जणांचा या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. कुलकर्णी यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. 26 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेले संजय कुलकर्णी यांनी 1993 साली सेवेत रूजू झाले. 2014 पर्यंत त्यांनी निरीक्षक म्हणून कार्य केले. दरम्यानच्या कालावधीत त्यांनी त्यांच्या कारकीर्दीत अनेक गुन्हे उघडकीस देखील आणले. संजय कुलकर्णी यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत 2014 सालापासून त्यांना अधीक्षकपदावर बढती करण्यात आली. 2017 साली जीएसटी कायदा अस्तित्वात आल्यावर त्याची रचना समजावून सांगण्यासाठी आणि विशेषतः याचा प्रचार आणि प्रसार ग्रामीण भागात करण्यासाठी त्यांनी 180 शिबिरांद्वारे कार्यशाळा आयोजित केले. क्लिष्टदायी कायदा मराठीत सोप्या शब्दात समजावून सांगण्यात त्यांचा हातखंडा आहे.