सोलापूर : गेल्या सात वर्षांपासून गाजत असलेली आणि सोलापूरच्या विमान सेवेला अडथळा ठरणारी सिद्धेश्वर कारखान्याची बेकायदेशीर चिमणी पाड कामाची वर्कऑर्डर महापालिकेने दिली आहे. बेंगलोरच्या बीनियाज कॉन्टेन्ट प्रायव्हेट लिमिटेड यांना आठ सप्टेंबर रोजी महापालिकेने पाडकामची वर्क ऑर्डर दिली आहे. अध्याप कोणत्याच माध्यमांमध्ये ही बातमी आली नाही मात्र सर्वप्रथम बातमी येस न्युज मराठी दर्शकांसाठी आम्ही दाखवत आहोत. वर्क ऑर्डर दिली असली तरी महाराष्ट्र शासनाच्या शासनाच्या न्याय व विधी विभागाचे पत्र आल्यानंतरच पुढील 60 दिवसात चिमणी पाडून टाकावी असे आदेशात म्हटले आहे या कामासाठी एक कोटी 17 लाख 60 हजार रुपये ठेकेदाराला सोलापूर महापालिका देणार आहे. चिमणी पाडण्याबाबत सोलापूर महापालिकेने नऊ ऑगस्ट 2019 रोजी ठराव क्रमांक 78 नुसार टेंडर मंजूर करून वर्कऑर्डर देण्याबाबत आणि वरील निधीची तरतूद करण्याबाबत मंजुरी दिली आहे. नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आता विधी व न्याय विभागाचे पत्र अंतिम सहीसाठी प्रलंबित आहे या पत्रावर सही झाल्यानंतर 60 दिवसात सिद्धेश्वर कारखान्याची चिमणी पाडली जाईल त्यानंतर विमान सेवेचा प्रमुख अडथळा दूर होणार आहे येत्या सहा महिन्यात विमानसेवा सुरू न झाल्यास उडान योजनेतून सोलापूर चे नाव कायमचे बाहेर जाईल त्यामुळे सोलापूरकरांनी विमान सेवा सुरू होण्यासाठी दबाव वाढवणे गरजेचे आहे