सोलापूर : दरवर्षीप्रमाणे दि.१५ डिसेंबर ते ३१ जानेवारी या कालावधीत सिद्धेश्वर यात्रा भरते. या यात्रेत नंदीध्वजाची मिरवणूक, अक्षता सोहळा व होमप्रदीपन असे मुख्य कार्यक्रम होणार असल्याची माहिती धर्मराज काडादी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या यात्रेला मकरसंक्रांत अथवा गड्डा यात्रा असे संबोधिले जाते. गेल्या ९०० वर्षापासून प्राचीन परंपरेनुसार हा विवाह सोहळा मोठ्या भक्तीभावाने व दिमाखाने साजरा होत आलेला आहे. श्री सिद्धेश्वर यात्रा पुर्वापार प्राचीन परंपरेनुसार सुरळीतपणे करण्यास श्री सिद्धेश्वर देवस्थान यात्रा कमिटी सज्ज झालेली आहे आणि या वर्षाची यात्रा अत्यंत दिमाखाने आणि परंपरेनुसार भरण्यास प्रारंभ झाला आहे.
या वर्षी १३ जानेवारी २०२० ते १७ जानेवारी २०२० या काळात यात्रा भरणार असून या यात्रेत दि.१३ जानेवारी रोजी यण्णीमंज्जन म्हणजे 68 लिंगास तैलाभिषेक, दि.१४ जानेवारी रोजी सम्मतिभोगी म्हणजे संमतिकट्ट्यावर अक्षता समारंभ, दि.१५ जानेवारी रोजी मकरसंक्रांत होममैदानावर होमप्रदीपन समारंभ, दि.१६ जानेवारी २०२० रोजी किंक्रांत होम मैदानावर दारूकामआणि लेझर शो होणार आहे., दि.१७ जानेवारी रोजी कप्पडकळ्ळी म्हणजेच नंदीध्वजांचे वस्त्रविसर्जन होणार असून दि.१४ जानेवारीला दुपारी १ वाजता अक्षता समारंभ होईल. १५ जानेवारीला रात्री होम मैदानावर होमप्रदीपन समारंभ दि.१६ जानेवारी रात्री ८ वाजता शोभेचे दारूकाम होईल. शोभेचे दारूकाम हे फक्त अर्धा तास चालणार असून यावर्षी लेझर शो ठेवण्यात आल्याने,लेझर शो हा १ तास चालणार आहे. आणि १७ जानेवारीला रात्री मल्लिकार्जुन मंदिरात कप्पडकळ्ळ होऊन धार्मिक विधीची सांगता होईल.
या पत्रकार परिषदेला भीमाशंकर पटणे, शिवकुमार पाटील, विश्वनाथ लबा, गिरीश गोरनळ्ळी, चिदानंद वनारोटे, विश्वनाथ आळंगे, बसवराज अष्टगी, राजशेखर येळीकर, गुरुराज मळगे, आदी उपस्थित होते