दौंड-सोलापूर रेल्वे मार्गावर दुरुस्ती आणि देखभालीसह तांत्रिक कामे करण्यात येणार असल्याने पुणे-सोलापूर दरम्यान धावणारी इंटरसिटी एक्स्प्रेस मार्च महिन्यापर्यंत प्रत्येक शनिवारी धावणार नाही. त्याचप्रमाणे दोन डेमू गाडय़ाही दर शनिवारी अशंत: रद्द करण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वेकडून कळविण्यात आले आहे.