मुंबई : कुलदीप यादव, मोहम्मद शमी आणि इतर भारतीय गोलंदाजांची केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर विराट कोहलीच्या भारतीय संघाने दुसऱ्या वन-डे सामन्यात १०७ धावांनी विजय मिळवला आहे. रोहित आणि लोकेश राहुलने या सामन्यात शतकी खेळी करत भारतीय संघाची बाजू वरचढ ठेवली. पहिल्या विकेटसाठी दोन्ही फलंदाजांनी २२७ धावांची भागीदारी केली. रोहित शर्माने १५९ तर लोकेश राहुलने १०२ धावा केल्या.