सोलापूर – खेळाने आयुष्यच बदलून टाकले. खेळामुळे दोन घास सुखाचे खायला मिळू लागले.हे शब्द आहेत,सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील बॉम्ब शोधक पथकातील हवालदार संतोष नरळे यांचे.म्हणून ते गरीब मुलांना खेळाचे प्रशिक्षण देतात.पाहुयात यावरील हा विशेष वृत्तांत….
संतोष नरळे यांची घरची हलाखीची परस्थिती होती.त्यात संतोषला कब्बडी खेळाची आवड.या खेळाने यांना पोलीस खात्यात नोकरी मिळवून दिलीय.आपल्या सारखी गरिबीची परस्थिती असणाऱ्या अनेकांना खेळामुळे आधार मिळालाय.जगण्याचं बळ मिळालय.त्यामुळे झोपडपट्टी भागातील खेळाडूंसाठी थोबडे वस्ती येथील रितेश बालक मंदिरात शिव शंकर स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून गरीब मुलांना खेळाचे शिक्षण दिले जातेय.
जेथे संतोष नरळे यांचा स्पोर्ट्स क्लब चालतो.त्याचा बाजूला दोन मोठ्या झोपडपट्या आहेत.यांच्याकडे शहरातील अनेक झोपडपट्टीतील विध्यार्थी प्रशिक्षण घेतात.नरळे यांच्या स्पोर्ट्स क्लबमध्ये 72 मुलं आणि 64 मुली प्रशिक्षण घेत आहेत.येथे मुलांसाठी राहण्याची आणि निवासाची सोय करण्यात आलीय.समज्यामधील दानशूर व्यक्तींच्या माध्यमातुन या मुलांना स्पोर्ट्स किट देण्यात आलंय.समाजातील दानशूरांनी मदतीचा एक हात या उपक्रमासाठी पुढे करावा असे आवाहन संतोष नरळे यांनी केलंय.
लाखो करोडो रुपयांची मालमत्ता असताना देखील अनेक उद्दोजक गरिबांकडे डुंकून देखील पाहत नाहीत.मात्र काही हजाराची नोकरी करणारा पोलीस कर्मचारी नोकरीतील वेळानंतर मिळणारा फावला वेळ आशा गरीब आणि होतकरू मुलांसाठी घालतोय.समाजसेवेने झपाटलेल्या अवलिया पोलीस कर्मचारी संतोष नरळे यांना लाईव्ह सोलापूरचा सलाम…