सोलापूर : आंबेकर उर्फ आजरेकर फड यांच्या वतीने ह.भ.प. भागवत महाराज चवरे यांच्या मार्गदर्शनाने ह.भ.प.रामकृष्ण महाराज रंधवे यांना कार्यकारी अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी विठ्ठल जोशी यांच्या हस्ते ह.भ.प.पंढरीनाथ महाराज चवरे आंबेकर उर्फ आजरेकर, वारकरी सेवाभूषण गौरव पुरस्कार देण्यात आला.हा पुरस्कार श्री विठ्ठल मंदिर सभामंडप, श्री क्षेत्र पंढरपूर या ठिकाणी प्रदान करण्यात आला.
तसेच अखिल भारतीय वारकरी मंडळाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी ह.भ.प.सुधाकर महाराज इंगळे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय वारकरी मंडळाचे राष्ट्रिय अध्यक्ष ह.भ.प. प्रकाश महाराज बोधले हे होते. याप्रसंगी ह.भ.प. मदन महाराज हरिदास, विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड,ह.भ.प.परमेश्वर महाराज बोधले यांच्यासह पंढरपुरातील फडकरी, दिंडीवाले आदी मान्यवर उपस्थित होते.