सोलापूर : श्री मलकारसिद्ध हायस्कूल, हालचिंचोळी येथील प्रशालेत 22 डिसेंबर 2019 रोजी स्व.भुताळी सुरवसे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ्य आणि थोर भारतीय गणिती श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंती निमित्त भव्य आरोग्य व रक्तदान शिबीर घेण्यात आला. याप्रसंगी उद्घाटक म्हणून जी.आर.इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी न्यू दिल्लीचे वरिष्ठ व्यवस्थापक अजय वर्मा उपस्थित होते. अध्यक्ष म्हणून प्रा.भिमाशंकर बिराजदार होते. तसेच यावेळी सेवानिवृत मुख्याध्यापक शिवशरण म्हेत्री व काळे सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी संस्थेचे संस्थापक म्हाळप्पा सुरवसे ,सचिवा रेणूका सुरवसे,उपाध्यक्ष महमद करनाचे व संचालक मंडळ तसेच सुभाष नागरसे,सिद्धाराम धर्मसाले, लिंगराज्य बोकडे ,मुख्याध्यापक व्यंकटेश बोकडे, गावचे सरपंच भीमाबाई बनसोडे आदि मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात स्व.भुताळी सुरवसे व थोर गणिती रामानुजन यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून करण्यात आला. यावेळी आरोग्य व रक्तदान शिबीराविषयीचे महत्त्व विद्यार्थ्यांना व उपस्थितीतांना अनेक मान्यवरांच्या मनोगतातून व्यक्त केले. तसेच अंशतः अनुदानित तत्वावर असलेल्या प्रशाला व संस्था असे सामाजिक उपक्रम राबविणारे खूपच कमी आहेत असे काळे सर यांनी आपले मत मांडले आणि रमेश घोलप यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी जिद्द व चिकाटीने अभ्यास करून यशस्वी व्हा असे शिवशरण म्हेत्री यांनी आपल्या मनोगतातून विचार व्यक्त केले.
यावेळी सहशिक्षक गुंडेराव मोरे, संतोष बिराजदार, राजू राठोड, शिवानंद पुजारी व शिक्षकेत्तर कर्मचारी, माजी विद्यार्थी, पालक, प्रमुख पाहूणे बहुसंख्येने आरोग्य व रक्तदान शिबीरात सहभाग घेतले.