सोलापूर, (प्रतिनिधी):- शेतकरी, महिला, गरजू आणि कष्टाळूंना प्रगती साधण्यासाठी कर्जाची आवश्यकता असेल तर बँक ऑफ इंडियाची दारं दिवसाचे 24 तास आणि आठवड्याचे 7 दिवस खुली राहतील असे प्रतिपादन बँक ऑफ इंडियाचे महाराष्ट्राचे महाव्यवस्थापक रमेशचंद्र ठाकूर यांनी केले. बँक ऑफ इंडियाच्या वतीने सोमवार दि. 23 डिसेंबर 2019 रोजी हुतात्मा स्मृती मंदिर मध्ये स्टार महोत्सव घेण्यात आला त्यावेळी ते बोलत होते यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे,जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा महाराष्ट्र राज्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र शिंदे, नाबार्डचे प्रदीप झिले, जिल्हा ग्रामीण विकाय यंत्रणेचे अधिकारी अनिल नवाल, बँक ऑफ इंडिया सोलापूर विभागाचे महाव्यवस्थापक अजय कडू, उपव्यवस्थापक शैलेशचंद्र ओझा, रामचंद्र पवार, अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते.
ज्यांनी कर्ज घेतले आहे त्यांनी नियमित कर्जाची परतफेड केली पाहिजे नाहीतर बॅँकेचे नुकसान तर होतेच त्याबरोबर आपल्या इतर सहकाऱ्यांचेही नुकसान होते कर्ज घेतलेल्यांनी कर्ज फेडले नाहीतर बँकेकडून इतरांना कर्ज देताना अडचण होते त्यामुळे गरजवंताना कर्ज मिळत नाही म्हणून कर्ज घेतल्यास नियमितपणे कर्जाची परतफेड केली पाहिजे. असेही रमेशचंद्र ठाकूर यांनी सांगितले. बँक ऑफ इंडियाकडून सर्व प्रकारच्या व्यवसाय, उद्योगाला तसेच घर खरेदी, शेतकरी, महिला बचतगट यांना कर्ज उपलब्ध करण्यात येत आहे. त्याचा लाभ प्रत्येकाने घेतला पाहिजे असेही ठाकूर यांनी सांगितले.
बँकेमुळे माझ्या जीवनाला कलाटणी मिळाली मी शेतकऱ्याचा मुलगा आहे म्हणून मी शेती आधुनिकपध्दतीने करण्याच्या हेतुने बँकेकडे ट्रँ्नटर खरेदीसाठी कर्ज मागणीसाठी गेल्यावर गावातील अनेकांनी कर्ज घेवून परतफेड केली नाही म्हणून माझे गाव काळ्यायादीत बँकेने टाकले होते त्यामुळे मला कर्ज मिळाले नाही आणि त्यामुळे मी शासकीय सेवेत येण्यासाठी प्रयत्न केला आणि मी पोलीस खात्यात आलो म्हणून कर्ज घेतलेल्यांनी त्याची परतफेड केलीच पाहिजे असे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी सांगितले.
प्रारंभी बँकेचे उपमहाव्यवस्थापक शैलेशचंद्र ओझा यांनी आलेल्या मान्यवरांचे स्वागत करून बँकेबाबतची माहिती दिली त्यानंतर सोलापूर विभागाचे महाव्यवस्थापक अजय कडू यांनी प्रास्ताविक करताना म्हणाले बँक ऑफ इंडियाने हर घर दस्तक च्या माध्यमातून गरजू शेतकरी, महिला, उद्योजक यांच्यापर्यत जावून कर्जाचे वितरण केले त्यातून अनेक योजना राबवण्यात आले यामुळे त्यांचा आर्थिक स्तर वाढणार आहे असेही अजय कडू यांनी सांगितले.
सोलापूर ते हिंगोली या सात जिल्ह्यात बँक इंडियाच्या 84 शाखा कार्यरत आहेत त्यातून मोठ्याप्रमाणात शेतकरी, महिला, उद्योजक, व्यवसायिक यांना कर्जाचे वितरण करण्यात येत आहे असे सांगून शेवटी उपमहाप्रबंधक शैलेशचंद्र ओझा यांनी आभार व्यक्त केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बँकेचे व्यवस्थापक सचिनकुमार, अग्रणी बँकेचे सोनवणे यांच्यासह घनश्याम आणि इतर अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मोठी मेहनत घेतली