मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यातील भिंतींवर काही अपशब्द लिहिल्यानं पुन्हा एकदा राजकारण तापू लागलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावाच्या सुरूवातीच्या काही अक्षरांचा उल्लेख करत बंगल्याच्या भिंतीवर काही अपशब्द लिहिण्यात आले आहेत.
याव्यतिरिक्त ‘भाजपा रॉक्स, देवेंद्र फडणवीस रॉक्स’ अशीही वाक्य भितींवर लिहिण्यात आली आहेत. परंतु या हे कोणी लिहिलं याबाबत मात्र कोणतीही माहिती समोर आली नाही.फडणवीस यांनी बंगला सोडला त्यावेळी भितीवर कोणत्याही प्रकारचा मजकूर लिहिला नव्हता. हे अतिशय खालच्या स्तरावरील राजकारण आहे. तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांनीदेखील यावर प्रतिक्रिया दिली. आमची बदनामी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यांच्या प्रतिक्रियेला प्रत्युत्तर देताना शिवसेना नेत्या आणि प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी लोकांना सर्व काही समजतं असं म्हटलं आहे.