सोलापूर : 3 जानेवारी रोजी उत्तर सोलापूर तालुक्यातील वडाळा येथील माऊली महाविद्यालयात सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने समाजशास्त्र विभाग अंतर्गत तक्रार निवारण समितीच्या वतीने युवती मेळाव्याचे अयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जी.एन.चिटे,भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष जितेंद्र साठे यांची प्रमुख उपस्थिती होती तर प्रमुख पाहुणे सोलापूर तालुका पोलीस ठाणे येथील पोलिस निरीक्षक माधुरी तावरे-बोत्रे,डॉ. शीला पटवर्धन,प्रा.डॉ. बिराजदार पी.आर.,उत्तर सोलापूर पत्रकार संघाचे उपाध्यक्ष हरिभाऊ घाडगे,प्रा.प्रज्ञा वाडकर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थिनी उपस्थित होते.यावेळी इंटरनेट व सोशल मीडियाचा दुरुपयोग न करण्याबाबत सर्व विद्यार्थिनींना व शिक्षकांना डॉ.शीला पटवर्धन यांनी शपथ दिली.पुढे तावरे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या की,ग्रामीण भागातील मुली या स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्याचे प्रमाण जास्त आहे.मी स्वतः ग्रामीण भागातील असून पूर्वीपेक्षा आज स्पर्धा परीक्षेत सामोरे जाताना अनेक सोयी ,सुविधा उपलब्ध झाल्या असल्याचे त्या म्हणाल्या.यावेळी माऊली महाविद्यालयाच्या सर्व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.