विद्यार्थ्यांनी केली ३५ हजाराची उलाढल…
वडाळा : ओ काका, ओ भैय्या, ओ आजी, ओ आजोबा, भाजी घ्या. वडे घ्या. शेंंगा लाडू घ्या, कचोरी घ्या, भेळ घ्या.म्हणून वडाळा काका झेडपी शाळेतील विध्यार्थ्यांनी आंंनद बाजारात घोषणा देऊन ग्राहकांना आकर्षित करीत होते. त्यामुळे शाळेतील परिसरात आठवडी बाजारासारखे वातावरण निर्माण झाले होते.
दि.०९ रोजी वडाळा येथील काका नगर झेडपी शाळेतील प्रांगणात विद्यार्थ्यांचा आंनद बाजार मेळावा मोठ्या उत्साहात भरला होता. या उपक्रमाचे उद्घाटन गावच्या सरपंच छाया कोळेकर, यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जितेंद्र साठे, माजी उपसरपंच यशवंत गायकवाड, जीवन साठे, सदानंद फंड ,मंगेश साठे ,तुषार साठे, अनिल गायकवाड , शरद गायकवाड, इत्यादी उपस्थित होते. सर्व मुलांनी वेगवेगळ्या पाले भाज्या, खाण्याचे पदार्थ, फळे, फुले यांचे आकर्षक असे १०१ स्टॉल उभे केले होते व या बाजारात पालकासह गावातील ग्राहकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला . या बाजारात ३५ हजार रूपयांची उलाढाल झाली असे शाळेचे मुख्याध्यापीकामंदाकिनी जाधव यांनी सांगितले हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशांत रजपूत,मिनाक्षी ठाकूर. मनिषा साखरे ,कविता होनमुटे आदींनी परिश्रम घेतले.