महाविकासआघाडीच्या मंत्रिमंडळ विस्तारात बच्चू कडू यांची राज्यमंत्रिपदी वर्णी लागली. मंत्रिपदाची जबाबदारी स्विकारल्यानंतर बच्चू कडू कामाला लागले आहे. पहिल्याच दिवशी त्यांनी दोन नायब तहसीलदावर कारवाई कारवाई केली आहे.
राज्यमंत्री बच्चू कडू आज अमरावतीत दाखल झाले. त्यानंतर दर्यापूर इथं बच्चू कडूंनी भेट दिली. संजय गांधी निराधार योजनेत हलगर्जीपणा केल्यामुळे निरीक्षक सपना भोवते आणि नागरिकांना रेशन कार्ड न दिल्याने नायब तहसीलदार (पुरवठा)प्रमोद काळे यांच्यावर निलंबनाचे आदेश दिले आहे. त्यांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे अधिकारी गटात एकच खळबळ उडाली.
राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सरकारने केलेल्या कर्जमाफीवरही भाष्य केलं. दोन लाखांच्या वर जर एक हजार रुपये असले तरी तरी तो कर्जमाफी बसत नाही. पण दोनच दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कर्जमाफीतील दुसरा टप्पा करतो आहे, असं स्पष्ट केलं आहे, त्यामुळे कर्जमाफीमध्ये राज्यातील पन्नास टक्के शेतकरी हे कर्जमुक्त होणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचा मुलगा आदित्य यांचा मंत्रिमंडळात समावेश केल्याने होत असलेल्या टीकेवरील प्रश्नाला बगल देत, ‘चांगल्या गोष्टीकडे बघा. काय वाईट झाले त्यांच्याकडे आपण दुर्लक्ष करा. त्याला अधिक चांगलं काम करता येईल याकड़े लक्ष द्या’, असंही बच्चू कडू यांनी सांगितलं.