सोलापुर : पोलिसांच्या मनमानी कारभारामुळे सोलापुरच्या नवीपेठेत बॅरीगेटिंग द्वारे नो व्हेईकल करण्यात आले होते . मात्र व्यापाऱ्यांच्या एकजुटीचा विजय झाला असून गेल्या सहा दिवसांपासून बॅरीगेटिंगमुळे बंदीवासात असलेली नवी पेठ शनिवार पासून वाहनांसाठी खुली झाली आहे. पोलिस उपायुक्त वैशाली कडूकर यांच्या निर्णयामुळे व्यापाऱ्यांना सहा दिवस फटका बसला आहे. काल नवी पेठ व्यापारी असोसिएशन यांनी बैठक घेऊन पोलिस प्रशासनाचा निषेध केला शिवाय तातडीने बॅरी गेटिंग काढावे अशी मागणी केल्यानंतर पोलिसांनी नरमाईची भूमिका घेतली आणि संपूर्ण बंदिवासात असलेली नवीपेठ झाले मोकळे आकाश या पद्धतीने शनिवारपासून खुली झाली आहे यामुळे व्यापाऱ्यांमध्ये आनंद व्यक्त होत आहे