सोलापूर प्रतिनिधी : डिसेंबर सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष व सभापती निवडीसंदर्भात सविस्तर चर्चा करुण दिशा ठरविणेसाठी मा.आमदार दिपकआबांची भेट घेण्यासाठी सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नूतन जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे हे सांगोला येथे पहिल्यांदाच आले असता त्यांचा सांगोला तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने माजी जिल्हाध्यक्ष तथा, मा. आमदार दिपकआबा साळुंखे-पाटील यांच्या उपस्थीतीत सांगोला शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष तानाजी काका पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सदरच्यावेळी सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष व सभापती निवडीसंदर्भात सविस्तर चर्चा करुण दिशा ठरवीण्यात आली.
दिपक आबांनी बळीराम काका साठे यांना नुतन जिल्हाअध्यक्ष म्हणुन निवडीबददल शुभेच्छा देवुन सांगीतले की, यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्षपदी काम करताना सर्वांना विश्वासात घेऊन पक्षसंघटन वाढवण्याच्या दृष्टीने काम केले आहे. . मोदी लाट व लोकसभा निवडणुकीच्या वेळी पक्षांमध्ये गट- तट व काही मतभेद निर्माण झाले असता, देशाचे नेते, तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरदचंद्रजी पवार,आदरणीय आजीतदादा पवार,खा.सुप्रियाताई सुळे, प्रदेशअध्यक्ष मा. ना. जयंतरावजी पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील नेतेमंडळींना एकत्रित आणून गट संपवून पक्ष संघटन व मजबूत करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केला. देशाचे नेते पवार साहेबांनी जो आदेश दिला त्या आदेशाला शीरसावंद समजून तालुक्यासह जिल्ह्यातील सक्षम पणे जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडली होती. असे सांगत काकांच्या यापूर्वीच्या कार्याची दखल घेऊन पक्षाने जबाबदारी दिली आहे ती जबाबदारी काका समर्थपणे पार पाडतील याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा पदाधिकारी व सहकारी म्हणून जेवढे वाटेल तेवढी मदत करण्याची भूमिका बजावली जाईल, असा विश्वास मा. आमदार दिपकआबा साळुंखे-पाटील यांनी दिला. सत्काराच्या वेळी जिल्हा सरचिटणीस लतिफ तांबोळी, दिगंबर सुडके, नगरसेवक सतीशभाऊ सावंत, हनुमंत नाना पवार,चंद्रकांत शिंदे,यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.