नागपूर : विद्यार्थ्यांना संस्कृत श्लोक शिकवा म्हणजे बलात्कार रोखता येतील, असं विधान राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलं आहे. नागपूर विद्यापीठातील आयोजित कार्यक्रमात ते बोलत होता. दिवसेंदिवस अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. ती रोखण्यासाठी संस्कृतचे श्लोक शिकवले पाहिजेत, असं ते म्हणाले.
नागपूर विद्यापीठातील जमनालाल बजाज अॅडमनिस्ट्रेटिव्ह भवनाच्या उद्घाटनासाठी राज्यपाल नागपूरमध्ये आले होते. यावेळी त्यांनी महिलांवरील होणारे अत्याचार कसे थांबवण्यात येतील, यावर आपलं मत व्यक्त केली. एक अशी वेळ होती, ज्यावेळी घराघरांमध्ये कन्यापूजन केलं जात होतं. परंतु सध्या देशात काय घडत आहे? काही लोकांकडू बलात्कार, अत्याचार अशा घटना घडत आहेत. आपल्या ताकदीचा वापर अत्याचारासाठी करावा की सुरक्षेसाठी करावा, असा सवालही त्यांनी केला. विद्यार्थ्यांना संस्कृत श्लोक शिकवा म्हणजे असे प्रकार रोखले जातील, असंही ते म्हणाले.