देवेंद्र फडणवीस यांच्या काळात 65 हजार कोटी रुपयांचा आर्थिक घोटाळा झाला आहे. कॅगने देखील यावर ताशेरे ओढले आहे असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अर्थमंत्री जयंत पाटील यांनी या प्रकरणाची दखल घेणार असल्याचं सूचक वक्तव्य केलं आहे. आमचं सरकार चौकशी सरकार नाही, मात्र रेकॉर्डवर असलेल्या प्रकरणांची दखल घेऊ, असंही जयंत पाटील यांनी सांगितलं.