माळशिरस प्रतिनिधी:प्रताप क्रिडा मंडळाच्या आयोजित समूहनृत्य स्पर्धत मोरजाई विद्यालयाने लोकनृत्यात आणि प्रासंगिक नृत्यात दोन्ही विभागात प्रथम क्रमांक पटकवला.या स्पर्धा सांस्कृतिक क्षेत्रात अतिशय प्रसिध्द आहेत.या स्पर्धामुळे अनेक ग्रामीण भागातील विद्यार्थाना अनेक चित्रपटात,मालिकात व पडद्यावर काम करण्याची संधी मिळाली आहे.हे विद्यालय ग्रामीण भागातील असूनही या विद्यालयाच्या कलाकाराने अतिशय सुंदर लोकनृत्य आणि प्रासंगिक नृत्य सादरीकरण करुन प्रेक्षक व रसिकांच्या टाळया घेतल्या.
या कलाकरांना प्रशस्तीपत्र,ट्रॉफी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष,जयसिंह मोहिते-पाटील,संस्थेच्या संचालिका,कु.स्वरूपराणी मोहिते-पाटील,स्पर्धा प्रमुख,अँड.नितीन खराडे यांच्या हस्ते देण्यात आले.या विद्यार्थाना मार्गदर्शन,मुख्याध्यापक,विकास सुर्यवंशी,रणजित बाबर,रुपनवर,शितोळे,हुलगे,लोंढे,सौ.मोरे,सौ.देशमुख,सौ.वजाळे यांनी केले.या दोन्ही गीतांचे दिग्दर्शन,मनोज वर्धम,प्रताप थोरात,रणजित बाबर यांनी केले.या विद्यालयाचा शालेय गुणवत्तेबरोबरच कला,क्रिडा,सांस्कृतिक क्षेत्रातही नावलौकिक आहे.या यशाबद्दल प्रशाला समितीचे सभापती,श्री.छगन माने,सर्व प्रशाला समितीचे सदस्य आणि पालक यांनी कलाकरांचे अभिनंदन केले.