सोलापूर- प्रभाग क्रमांक सात मधील डोंगरे पान शॉप ते गुजराती हॉल ते अभियंता भवन या नंदीध्वज मार्गा वरील विद्युतधारा अंडरग्राउंड करण्याच्या कामाचा शुभारंभ सिद्धरामेश्वर यात्रेचे प्रमुख मानकरी राजशेखर हिरेहब्बू ,माजी नगरसेवक महेश थोबडे,ज्येष्ठ समाजसेवक सुधीर थोबडे,जगदीश हिरेहब्बू ,मनोज हिरेहब्बू,प्रतापसिंह चौहान, मोहन डोंगरे,बापू मडिवाळ यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कामाचा शुभारंभ करण्यात आले.या वेळीस नगरसेवक देवेंद्र कोठे,प्रथमेश कोठे,सूरज चौहान, किरण पवार, विद्युत विभाग प्रमुख राजेश परदेशी, एम. एस.ई.बी चे नागणे ,प्रमोद मोकाशी,श्रेयस भोगड,इमरान शेख,बाबा शेख,राहुल गोयल,सचिन काशीद उपस्थित होते. सदर रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या विद्युतधारा असून त्यामुळेच नंदीध्वज यात्रेत त्याची अडचण होत होती. मागील तीन वर्षापूर्वी यात्रेत या ठिकाणी अपघात झाला होता तेव्हापासून यात्रा प्रमुखांनी तारा अंडरग्राउंड करण्याची मागणी केली होती. या साठी नगरसेवक देवेंद्र कोठे यांनी सातत्याने महापालिकेत आवाज उठवला होता. सदर विषयाचे गांभीर्य ओळखून त्याला मंजुरी मिळवून घेतली होती. महापालिका आयुक्त दिपक तावरे यांनी या ठिकाणी पाहणी करून सदर काम यात्रेपूर्वी करण्याचे संबंधितांना आदेश दिले. तातडीने या कामाचे टेंडर काढून आज या कामाला सुरुवात झाली असून, चार दिवसात हे काम होणार आहे. त्यानंतर सदर रस्त्यावरील डांबरीकरणाचे राहिलेले दोन थर यात्रे पूर्वीच पूर्ण करण्यात येणार आहे..