No Result
View All Result
- सोलापूर : महापालिकेच्या प्रत्येक सभेमध्ये पाठीमागील सभेमध्ये दिलेल्या आदेशानुसार काय कारवाई झाली याबाबत कार्यवाही चे मुद्दे सभेच्या पटल्यावर ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी गेल्या महिन्यात झालेल्या महापालिका सभेत दिले होते .आता डिसेंबर महिन्यातील सर्वसाधारण सभा उद्या दिनांक 20 डिसेंबर रोजी चार वाजता होणार आहे त्यामुळे या सभेत जिल्हाधिकार्यांनी दिलेल्या आदेशाची पायमल्ली करण्यात आली आहे .सभा पटलावर कार्यवाहीचे मुद्दे ठेवण्यात आले नाहीत. शिवाय प्रत्येक सभेमध्ये पहिला विषय हा पाठी मागील सभेचे इतिवृत्त मंजूर करण्याबाबतचा असतो तो विषय देखील गाळण्यात आला आहे. वर्षानुवर्षे महापालिकेत प्रश्नोत्तरे हा विषय कधीच घेतला जात नाही त्यामुळे नव्या महापौर श्रीकांचन यन्नम आणि विद्यमान नगरसेवक जिल्हाधिकाऱ्यांच्या या बाबींकडे लक्ष वेधततील का याची उत्सुकता लागली आहे.
No Result
View All Result