एस न्युज मराठी नेटवर्क : इराणचा टॉप लष्करी कमांडर कासिम सुलेमानीच्या अंत्ययात्रेदरम्यान चेंगराचेंगरी झाली आहे. यामध्ये ३५ जण ठार झाले असून ४८ जण जखमी झाल्याची माहिती आहे. अमेरिकेने शुक्रवारी पहाटे केलेल्या एअर स्ट्राइकमध्ये जनरल कासिम सुलेमानीचा मृत्यू झाला.
अमेरिकन सैन्यासंबंधी काय निर्णय घेतला?
अमेरिका आणि इराणचे संबंध धोकादायक पातळीला पोहोचले असून, दोन्ही देशांमध्ये युद्ध सुद्धा भडकू शकते अशी स्थिती आहे. आता इराणने अमेरिकेच्या सर्व सैन्यदलांना दहशतवादी घोषित केले आहे. इराणचे मंत्री मोहम्मद जावाद अझारी जाहरोमी यांनी ट्रम्प यांना ‘सूटातला दहशतवादी’ म्हटले आहे.