औरंगाबाद : देशभरात नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी विरोधात नागरिकांचा संताप पाहायला मिळत आहे. हेच चित्र औरंगाबादमध्येही दिसलं औरंगाबादमध्ये या दोन्ही कायद्यांना विरोध करण्यासाठी 1 लाखाहून अधिक नागरिकांना उत्स्फुर्त हजेरी लावली. मात्र, यानंतर औरंगाबाद पोलीस आयुक्तांनी तात्काळ शहरात तब्बल 72 दिवसांसाठी कलम 144 लागू करत जमावबंदीचे आदेश दिले आहेत. यामुळे नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.