सोलापूर: एम. आय. टी. विश्वशांती गुरुकुल स्कूल, जिल्हा परिषद शिक्षण विभाग, विज्ञान केंद्र सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने मध्ये ४५वे उत्तर सोलापूर शहरस्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे बक्षीस वितरण समारंभ मध्ये सोलापूर जिल्हा परिषद शिक्षण विभागाचे अधिक्षक मा.सुनील शिखरे यांच्या हस्ते बक्षीस पारितोषिक वितरण पार सोहळा पार पडला यावेळी , शिक्षणविस्तार अधिकारी अशोक भांजे यांनी विज्ञान प्रदर्शनाचा उद्देश सांगुन विद्यार्थ्यांच्या व्यापक दृष्टिकोनाचे कौतुक केले,एम.आय. टी.विश्वशांती गुरुकुल स्कूलच्या प्राचार्या संगीता मेहरोत्रा यांनी शाळेची माहिती सांगितली या विज्ञान प्रदर्शनात बक्षीस म्हणून रोख रक्कम एक हजार रुपये सन्मान चिन्ह प्रमाणपत्र देण्यात आले बक्षीस मिळालेले विद्यार्थी व शिक्षक पुढीलप्रमाणे प्राथमिक विभाग इ.६वी ते ८वी मध्ये प्रथम स्नेहल हिप्परकर(विश्वशांती गुरुकुल स्कुल सोलापूर)प्रकल्पाचे नाव भविष्यातील वाहतूक दळणवळण ,व्दितीय अमेय जडे (मेहता प्रशाला)प्रकल्पाचे नाव रोटेटींग सोलार पँनल ,उत्तेजनार्थ पुष्पक कोरे (माँडर्न हायस्कूल )प्रकल्पाचे नाव गणित स्नेक लँडर माध्यमिक व उच्च माध्यमिक विभाग इ.९वी ते १२वी मध्ये प्रथम अभिषेक बिज्जा (वालचंद काँलेज)प्रकल्प एच.एच.ओ. जनरेटर व्दितीय सानिया शेख (प्रोग्रेसिव्ह स्कुल)प्रकल्प स्मार्ट हेल्मेट, उत्तेजनार्थ अभिषेक दुस्सा (नेताजी स्कुल)प्रकल्प अँटोमँटीक स्ट्रीट लाईट, शिक्षक विभाग प्राथमिक सौ सरस्वती बटाळे, माध्यमिक विभाग सौ.प्रियांका आराध्ये व प्रयोगशाळा साहयक सपताळे टी.एल. यांना देण्यात आले तसेच आलेल्या विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी विश्वशांती गुरुकुल चे आपल्या मनोगतात भरभरून कौतुक केले या विज्ञान प्रदर्शनाच्या बक्षीस वितरण सोहळ्याचे सुत्रसंचालन स्वप्निल कोंडगुळे तर प्रमुख पाहुण्यांची ओळख व आभार शांतकुमार साबळे यांनी केले उत्तर सोलापूर व शहरातील अनेक शाळांतील विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनात सहभाग नोंदवला हे प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी बंडोपंत बाबर, श्रीशैल हडपद,करण शिंदे, संजय तट्टे माधुरी कोले यांच्या सह एम.आय.टी.विश्वशांती गुरुकुलज्युनिअर काँलेज व स्कूलमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.