सोलापूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे केवळ आपली खुर्ची वाचवण्याची कवायत करत आहेत. आपल्या बाजुला बसलेले पक्ष कसे खुश राहतील, त्यांच मन कसं राखलं जाईल, याचा विचार त्यांच्याकडून करण्यात येत आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काहीही उत्तर दिलं जात नाही. म्हणूनच आम्ही सभात्याग केला, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
शेतकऱ्यांच्या हेक्टरी २५ हजार रूपयांची मदत देण्याच्या आश्वासनाचं काय झालं? असा सवालदेखील फडणवीस यांनी यावेळी केला. आपल्या बाजुला बसलेले पक्ष कसे खुश राहतील, त्यांचं मन कसं राखलं जाईल याची काळजी मुख्यमंत्री घेत आहेत. परंतु शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काहीही बोलत नाहीत. त्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम केलंय. राज्यपालांच्या अभिभाषणावर जे मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं तसं भाषण महाराष्ट्राच्या इतिहासात यापूर्वी कधीही झालं नाही. ते सभागृहात नाही तर शिवाजी पार्कातील रॅलीत भाषण करत आहेत असं वाटत होतं. हे शेतकऱ्यांचा अपमान करणारं सरकार आहे. पहिल्याच अधिवेशनात आपल्या शब्दांवरून सरकार पलटलं आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.