गेट वे ऑफ इंडिया : सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए), राष्ट्रीय नागरिक नोंदवही (एनआरसी) याविरोधात माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वाखाली गेट वे ऑफ इंडिया येथून ‘गांधी शांती यात्रे’ला गुरुवारी सकाळी सुरुवात झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा शरद पवार यांनी या यात्रेला हिरवा झेंडा दाखवला.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे समन्वयक प्रकाश आंबेडकर, माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण, आशिष देशमुख, मंत्री नवाब मलिक आदी नेते उपस्थित होते. गेट वे ऑफ इंडिया येथून सुरु झालेल्या या यात्रेचा शेवट दिल्लीतील महात्मा गांधींचे स्मृतीस्थळ राजघाट येथे होणार आहे.
यशवंत सिन्हा म्हणाले, “मोदी सरकारने आणलेला हा कायदा देशाचे विभाजन करणारा आहे. मात्र, आम्ही पुन्हा देशाचे विभाजन होऊ देणार नाही. आम्ही गांधींची पुन्हा हत्या होऊ देणार नाही. यापूर्वी आम्ही एक होतो आणि यापुढेही एक राहू, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.”