येस न्युज मराठी नेटवर्क : उद्धव ठाकरे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार सोमवारी दुपारी एक वाजता विधानभवनात राज्यपालांच्या उपस्थितीत होणार आहे .28 नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह 7 मंत्र्यांनी गोपनीयतेची शपथ घेतली होती .त्यानंतर एक महिना उलटल्यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त लागला आहे एकूण 43 पेक्षा जास्त मंत्रीपदे देता येत नाहीत त्यामुळे उर्वरित 36 आमदारांना आज मंत्रीपदाची शपथ दिली जाणार आहे .सर्वच्या सर्व जागा भरणार की काही जागा रिक्त ठेवणार याबाबत शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीने गुप्तता पाळली आहे अपेक्षेप्रमाणे उपमुख्यमंत्रीपद हे अजित पवार यांना मिळणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे तर प्रणिती शिंदे यांचा मंत्रिमंडळात समावेश होणार का याची उत्सुकता सोलापूर जिल्ह्याला लागली आहे