सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनी 33 टक्के आरक्षण लागू करुन महिलाचा सन्मान केला आहे.आज देशाच्या सर्वोच्चपदी द्रौपदी मुर्मू यांच्या रूपाने महिला आहे.सर्वच क्षेत्रात महिला पुढे असून उद्योग क्षेत्रातही महिलांनी मागे राहू नये असे प्रतिपादन आमदार विजयकुमार देशमुख यांनी केले. रविवारी रेवणसिध्देश्वर मंगल कार्यालयाच्या सभागृहात भारतीय योग संस्थान नवी दिल्ली संचलित बसव योग केंद्रातर्फे नारीशक्ती गौरव पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
यावेळी आमदार देशमुख बोलत होते.यावेळी श्री सिद्धेश्वर बँकेचे संचालक नरेंद्र गंभीरे,उद्योजक व्यंकटेश चाटला, उद्योजक वीरेंद्र हिंगमिरे, सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे,केंद्र प्रमुख मीनाताई पंचाक्षरी उपस्थित होते. याप्रसंगी जीवनगौरव पुरस्कार शांताबाई रंगदाळ यांना अध्यात्मिक सेवा पुरस्कार सिंधूताई काडादी, नागरी सेवा पुरस्कार संजीवनी व्हट्टे, यशस्वी उद्योजिका पुरस्कार लक्ष्मी बिराजदार, वैद्यकीय सेवा पुरस्कार डॉ. वैष्णवी तंबाके, प्रेरणा पुरस्कार सुवर्णा साखरे तर आदर्श सामाजिक संस्था पुरस्कार मोरया महिला प्रतिष्ठानला प्रदान करण्यात आला. शाल, स्मृती चिन्ह, सन्मानपत्र, बसव पदक, सिद्धरामेश्वरांचे चरित्र असे पुरस्काराचे स्वरूप होते.
यावेळी ग्रामदैवत सिद्धरामेश्वर महाराजांचे चरित्र ग्रंथाचे द्वितीय आवृत्तीचे प्रकाशन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले तसेच बसवयोग केंद्राच्या यूट्यूब चैनलच्या लोगो अनावरही करण्यात आले.यावेळी नरेंद्र गंभीरे यांनी महिलांनी स्वताच्या पायावर उभे राहण्याचा प्रयत्न करावा असे सांगूनयासाठी बसव योग केंद्राने पुढाकार घ्यावा असे आवाहन केले. काडादी,व्हट्टे,डाॕ.तंबाके,रंगदळ , बिराजदार यांनी मनोगत व्यक्त केले. उज्वला शिंवगुंडे यांनी प्रास्ताविक केले तर सूत्रसंचालन श्रुती बोगा यांनी केले तर प्रज्ञा ख्याडे यांनी आभार प्रदर्शन केलेया कार्यक्रमास बसव योग केंद्राचे पदाधिकारी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.