कान्होबा तुझी घोंगडी चांगली गायलेल्या अभंगाने भारतरत्न भिमसेन जोशी यांचे झाले स्मरण
पुणे:- जागतिक किर्तीच्या सर्वात मोठ्या अभिजात शास्त्रीय संगीताचे माहेरघर असलेल्या आर्य प्रसारक मंडळ पुणे आयोजित ७० व्या सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवात भारतरत्न पं.भिमसेन जोशी यांचे नातू विराज जोशी यांचे गायनाने आपल्या आजोबांची स्वरांची छाप सर्व उपस्थित संगीत रसिकांवर पाडली.आणि भिमसेन जोशी यांची किराणा घराण्याची दमदार गायकी समर्थपणे पेलणार यांचा अनुभव याची देही याची डोळा रसिकांना अनुभवला मिळाला.
सुरुवातीला विराज जोशी यांनी किराणा घराण्याचा खास असलेला राग पुरीया विलंबित एकतालामध्ये हे पिया गुणवंता गात आपल्या आजोबांच्या चरणी गायन सेवा समर्पित केली.त्यामध्ये आलाप.दमदार ताना घेत रसिकांना मंत्रमुग्ध करत होता.त्यानंतर तीनतालातील अप्रतिम बंदिश मैं तो घर आयी त्याला जोडून ठुमके पग पायल बाजे अतिशय सुंदर रचना गात आनंद देऊन गेली.शेवटी भिमसेन जोशी म्हटले की अभंग हा आलाच त्यांनी अजरामर केलेला कान्होबा तुझी घोंगडी चांगली अतिशय सुंदर गात रसिक श्रोत्यांना पांडुरंगाच्या गजराने टाळ्यांचा ठेका धरला.तो अविस्मरणीय क्षण सर्वांनी अनुभवला.शांत संयत रागाची मांडणी हे गायनाच वैशिष्ट्य ठरले.
त्यांना तितकीच सुंदर आणि दमदार साथसंगत (तबला)पांडुरंग पवार (हार्मोनियम)अविनाश दिघे (पखवाज) ज्ञानेश्वर दुधाणे ऑर्गन राहुल गोळे (टाळ) माऊली टाकळकर स्वरसाथ अभयसिंह वाघचौरे दशरथ चव्हाण तर तानपुरा दिगंबर शेड्युळे मोबीन मिरजकर यांनी साथसंगत करत कार्यक्रमाची अधिक रंगत वाढली. पं.श्रीनिवास जोशी शिल्पा ताई जोशी यांचे मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या महोत्सवात रसिकांची अभिजात शास्त्रीय संगीत ऐकण्याची ही मोठी संधी आणि त्याला मिळणारा प्रतिसाद भविष्यकाळात निश्चितच ही शास्त्रीय संगीताची मोठी परंपरा प्रभावी पणे पुढे नेण्यासाठी आश्वासक ठरत आहे.यावेळी आर्य संगीत प्रसारक मंडळाचे वतीने सर्व कलाकारांचा सन्मान केला.प्रभावी तितकच सुंदर सुत्रसंचलन आनंद देशमुख यांनी केले