सोलापूर – स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त सोलापूर जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती मध्ये माझी माती माझा देश उपक्रमा अंतर्गत पंचप्रण शपथ घेणेत येणार आहे. या उपक्रमांत सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन सोलापूर जिल्हा परिषदेचच्या सिईओ मनिषा आव्हाळे यांनी केले. आज शिवरत्न सभागृहात विभाग प्रमुख व गटविकास अधिकारी यांची बैठक सिईओ मनिषा आव्हाळे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीस अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे, जलजीवन मिशन प्रकल्प संचालक अमोल जाधव, प्रभारी मुख्य लेखा व वित्त अधिकारी उत्तम सुर्वे, सर्व विभाग प्रमुख व गटविकास अधिकारी उपस्थित होते.
माझी माती माझा देश या उपक्रमाचे सर्व ग्रामपंचायती पंचप्रण शपथ चे सकाळी १० वाजता आयोजन करणेत आले आहे. ग्रामस्थांना या उपक्रमांत सहभागी करून घ्या. दि. १३ ते १५ आॅगष्ट दरम्यान “हर घर तिरंगा “ उपक्रमाचे या वर्षी देखील आयोजन करणेत आले आहे. या उपक्रमाचे चांगले नियोजन करा. सर्वांना माहिती द्या. जनजागृती करा. दंवडी द्या. समाज माध्यमांचा प्रभावी वापर करा. केंद्र शासनाचे संकेतस्थळावर फोटो अपलोड करा अशा सुचना सिईओ आव्हाळे यांनी दिले.
हर घर तिरंगा बाबत बोलताना सिईओ म्हणाल्या , तिरंगा ध्वज ज्यांनी जतन करून ठेवले आहेत त्यांनी पुन्हा वापरणेस हरकत नाही. नव्याने तिरंगा ध्वज स्वयंसहायता बचत गट तसेच स्थानिक विक्रेते यांचे कडून खरेदी करावेत.
शासन आपल्या दारी उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करा
शासन आपल्या दारी उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करा असे आवाहन सिईओ मनिषा आव्हाळे यांनी केले. लाभार्थ्यांना वेळेत अनुदान द्या. शौचालयाचे अनुदान देखील वेळेत द्या. शिल्लक लाभार्थ्यांना १५ आॅगष्ट च्या अनुदान वितरीत करा. आशा स्पष्ट सुचना दिल्या. पॅढरपूर येथे होणारे कार्यक्रमाचे सुक्ष्म नियोजन करा. अशा सुचना सिईओ मनिषा आव्हाळे यांनी दिल्या.
पंचप्रण शपथेचा नमूना
आम्ही शपथ घेतो की :-
• भारतास 2047 पर्यंत आत्मनिर्भर आणि विकसित राष्ट्र बनविण्याचे स्वप्न साकार करु.
• गुलामीची मानसिकता मूळापासून नष्ट करु.
• देशाच्या समृध्द वारशाचा गौरव करु.
• भारताची एकात्मता बलशाली करु आणि देशाचे संरक्षण करणाऱ्यांप्रती सन्मान बाळगू.
• देशाचे नागरीक म्हणून सर्व कर्तव्यांचे पालन करु.